Kalyan Accident News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Accident News: चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं अन् अनेक वाहनांना दिली धडक; लालचौकी परिसरात उडाली खळबळ

Kalyan Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिमेच्या लालचौकी परिसरात घडली. या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Sandeep Gawade

Kalyan Accident News

चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिमेच्या लालचौकी परिसरात घडली. या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बसचालकाच्या आजारपणाच्या त्रासामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणहून भिवंडीच्या दिशेने दुपारी एकच्या सुमारास ही एसटी बस चालली होती. त्यावेळी लालचौकी परिसरात बसचालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि इतर वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लालचौकी परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात चार गाड्यांचे नुकसान झाले असून एक जण जखमी झाला आहे. स्थानिक पोलिस पुढील तपास करत आहेत.

विरारमध्ये दोन लाखांचा गांजा जप्त

विरारमध्ये दोन लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई करून एकाला अटक केली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास मोर्या (वय २६) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. विकास हा अंधेरी पूर्व येथील राहणारा असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी (ता. १) एक जण विरार पूर्वेतील चंदनसार परिसरातील विरार वजनकाटा येथे गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहिती विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून संशयास्पद फिरणाऱ्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा १० किलो गांजा आढळून आला असल्याची माहिती विरारचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत देशमुख यांनी दिली.

ठाणे-मुलुंड दरम्यान शनिवारी रात्री 'ट्रॅफिक ब्लॉक'

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (ता. ३) रात्री ठाणे ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ५ तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

ब्लॉकदरम्यान रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून डाऊन जलद मार्गावरील खोपोली लोकल विद्याविहार ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी येथून रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सुटणारी कल्याण आणि कल्याण स्थानकातून रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी लोकलही रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT