rajgurunagar nagar parishad saam tv
मुंबई/पुणे

Rajgurunagar News : राजगुरुनगर पालिकेच्या मुख्याधिका-यांवर गुन्हा दाखल

या कारवाईमुळे राजगुरुनगर पालिकेतील भ्रष्टाचाराची चर्चा शहरात पुन्हा एकदा सुरु झाली.

रोहिदास गाडगे

Pune News : पुण्याच्या राजगुरुनगर पालिकेतील भ्रष्टाचाराची जाेरदार चर्चा शहरात सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. लाच प्रकरणात अडकलेल्यांना प्राेत्साहित केल्याचा ठपका ठेवत राजगुरुनगर पालिकेच्या मुख्याधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

राजगुरुनगर पालिकेच्या आरोग्य विभागात पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना दाेघा कर्मचा-यांना एसीबीने नुकतेच रंगेहात पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनूसार आरोग्य विभागातील अधिकारी चारुबाला हारडे आणि लेखाधिकारी प्रविण कापसे यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या दोघांना विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. एसीबीने या प्रकरणात कर्मचा-यांना लाच घेण्यास प्राेत्साहित केल्याने मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. लाळगे हे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली आहे. पाेलिस लाळगेंचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात थरारक दुहेरी मृत्यू; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT