Bribe Saam tv
मुंबई/पुणे

Bribe: जिल्हा परिषद हादरली; २५ हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी सापडल्या

शिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

रुपेश पाटील

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या (palghar zilla parishad) प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (palghar education officer) लता सानप (lata sanap) यांना बोईसर पालघर (boisar palghar) रस्त्यावरील एका गृहसंकुलातील सदनिकेत २५ हजार रुपयांची लाच (bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) अटक (arrest) केली. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व चौकशी सुरू करण्यात आली आहे. (palghar latest marathi news)

एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप व पथकाने सानप यांच्यावर सापळा रचून ही कारवाई केली. एका शिक्षकाच्या बदली प्रस्ताव प्रकरणी सानप यांनी लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार एसीबीकडे आली हाेती.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथक तयार करुन सानप यांच्यावर सापळा रचला. तक्रारदार शिक्षकाकडून २५ हजाराची लाच घेताना सानप रंगेहाथ सापडल्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT