Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : शासकीय विश्रामगृहात महिलेवर अत्याचार; शिवसेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

शिवसेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर बलात्कार करणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदारावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम खंदारे असे माजी शिवसेनेच्या आमदाराचे नाव आहेत. (Crime In Pune)

३७ वर्षे पीडित महिनेवर आमदार खंदारे यांनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आयबी रेस्ट हाऊस या शासकीय निवासस्थात बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी बिबेवाडी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने चाकूचा धाक दाखवत नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम खंदारे हे मूळचे सोलापूरचे (Solapur) असून १९९५ मध्ये ते राज्यमंत्री होते. खंदारे हे भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये माजी सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री होते. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंदारे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT