Abdul Sattar On Ambadas Danave 
मुंबई/पुणे

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचे कोर्ट तयार करा...; TET प्रकरणावरुन अब्दुल सत्तारांचे टीकास्त्र

'माझा मुलगा आता 'एलएलबी'ला आहे. त्याने टीईटी दिलीच नाही. आमच्या परिवाराने त्याचा उपयोग घेतला असता तर नोंद असती.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Scam) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच या गैरप्रकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.

शिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याच विद्यार्थ्यांच्या यादीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांची नावे असल्याची चर्चा सुरू आहे. याच प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी सत्तार यांनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, 'माझ्या मुलगा आता 'एलएलबी'ला आहे. त्याने टीईटी दिलीच नाही. आमच्या परिवाराने त्याचा उपयोग घेतला असता तर नोंद असती. अपात्र झाल्यानंतर माझ्या मुलीला जे ६ हजार मिळत होते ते देखील बंद झाले. मग हे कोणी केलं? यामागे कोण आहेत त्यासाठी चौकशीची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ -

मी स्वत: प्रेसला माहिती दिली. ज्याने यासाठी डोके लावले तो समोर येत नाहीत तोवर मी शांत बसणार नाही. परिक्षेला बसले म्हणूनच आपात्र ठरले ना? कागद खरे आहेत की खोटं आहेत. मुख्यमंत्र्यांना मी याबाबत पत्र देणार आहे. कोणी केलं, कसं केलं या मागचा सूत्रधार कोण आहे? याची चौकशी करा अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

सत्तार म्हणाले, 'TET एकतर पगार मिळण्यासाठी किंवा नोकरीसाठी करतात. या घोटाळ्यामागे कोण सूत्रधार आहे हे समोर यायला हवं. आता या प्रकरणाची ईडी चौकशी होणार आहे. माझ्या मुलांनी जर अर्ज केला असेल तर ते गुन्हेगार ठरतील. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचे एक कोर्ट तयार करा म्हणजे तेच निर्णय देतील असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी यांनी सत्तार यांच्यावर आरोप केले होते. सत्तार मंत्री असताना घोटाळा झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी. मी थेट अब्दुल सत्तार यांचं नाव घेत नाही. पण, आमदार अब्दुल सत्तार हे मंत्री होते. त्यावेळी हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणी दानवे यांनी केलेली त्यांच्या याच वक्तव्यावर सत्तार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.

शिवाय कायद्यानुसार मी उत्तर देईन, मी तीन वेळा मंत्री राहिलो आहे. तर कसलं मंत्रिपद मी काय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नाहीय मी एक साधा आमदार आहे. माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसला नाही. मग नाव कसं काय आलं, कागद लपवली असा अर्थ होत नाही काल जी फेक यादी त्याचा मी स्वीकार करू का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT