दहावीत 95 टक्के गुण, नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या तरुणीची आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

दहावीत 95 टक्के गुण, नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या तरुणीची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या व सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडर श्रीया गुणेश पुरंदरे (वय-17, रा. डी-103, मधुवंती, नांदेड सिटी, नांदेड, ता. हवेली) हिने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे दिसून आले. अभिजीत देशमुख यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. श्रीया होती नॅशनल हॉर्स रायडर होती.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स राडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना श्रीयाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

Hair Care: टोमॅटोच्या रसाने केस पुन्हा उगवू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Maharashtra News Live Update: चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT