Crime In Virar चेतन इंगळे
मुंबई/पुणे

धक्कादायक : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचीच केली हत्या

मित्राचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची हत्या.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना विरार (Virar) येथे घडली आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने याप्रकरणी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.

मोहम्मद सद्दान अन्सुरी वय ३० वर्ष हा सोमवारी दुपारी विरार पूर्वेच्या चंदनासार येथे मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी त्याचा मित्र अन्वरूल याचे काही अज्ञात व्यक्तीबरोबर भांडण सुरू झाले. ते पाहून सद्दाम अन्सुरी हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्याच वेळी अज्ञात व्यक्तींनी सद्दाम याला मारहाण करत आणि चाकूचे वार केले

या हल्ल्यात सद्दाम जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात (Virar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा ३ चे पथक करत होते.

कसलाही दुवा नसताना पोलिसांनी २४ तासांच्या आता कुर्ला येथून दानिश शेख वय २५ या आरोपीला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा ३ चे प्रमुख पोलीस (Police) निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT