Pune Mulshi News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला अन् जीव गमावून बसला; १२०० फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Pune Mulshi News: प्लस व्हॅली परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

दिलीप कांबळे

Pune Mulshi News

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी मधील प्लस व्हॅली परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन विरेश लोणी (वय २१ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी रोहन आपल्या ५ मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली याठिकाणी पर्यटनासाठी आला होता. यावेळी रोहन अंघोळ करण्यासाठी एका कुंडात उतरला.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो कुंडात बुडू लागला. इतर मित्रांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

बाराशे फूट खोल दरीतील कुंडात उतरून रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा कुंडात पडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.

उंच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, कुंडात पोहण्यासाठी उतरणे, तसेच स्टंड देखील करतात. अशा कृत्यांमुळे जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे याठिकाणी येताना पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागपूर महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचे पाणी बचतीसाठी निर्देश

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT