Peacock  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

हे तर गाव मोराचे...! मावळातील मोरावर प्रेम करणारे एक गाव

पवन मावळातील (Maval) धानगव्हाण या गावातील ग्रामस्थांचा मोर मित्र झाला आहे.

दिलीप कांबळे

पुणे: अरण्यातील मोर जेव्हा गावात नाचतो, तेव्हा अनेकांना आनंद गगनात मावेनासा होतो. पवन मावळातील (Maval) धानगव्हाण या गावातील ग्रामस्थांचा मोर (Peacock) मित्र झाला आहे. हा मोर तांदूळ, गहू, हुरडा, शेंगदाणे, गाव करील तेच राव करील या उक्तीप्रमाणे हा मोर या गावातील (village) नागरिकात मिसळून गेला आहे. साधारण ४ वर्षपूर्वी एका गावकऱ्याला (villager) रानात २ अंडी मिळाली, त्यानी ती अंडी आणून कोंबडीच्या खुराड्यात ठेवली असता. २१ दिवसांनी त्यामधून २ पिल्ले बाहेर आली.

हे देखील पहा-

प्रथम ही पिल्ले लहान होती. ती कोंबडीच्या (Chicken) पंखात सुरक्षित राहिली आणि बघता- बघता मोठी झाली. त्यातील एक पिल्लू कोरोना (Corona) काळात दगावले, तर दुसरा मोर आज ही गावकऱ्यांच्या आश्रयात सुखरूप आहे. रोज सकाळी आपला पिसारा फुलवून जसा काही गावकऱ्यांना अन्न देण्यासाठी खुणावत असतो. यामुळे या मोराची चर्चा पवन मावळात दूर- दूर पसरली आहे. गावातील कुत्री, मांजरे सुद्धा याचे मित्र झाले आहेत.

यामुळे या राष्ट्रीय पक्षाचा मावळातील या धानगव्हाण गावात मुक्त संचार सुरू आहे. स्थानिक कवी उमेश माळी यांनी या सुंदर राष्ट्रीय पक्षी मोर याच्यावर लिहिलेल्या २ ओळीच्या कविता आपल्याला चांगला संदेश देत आहे. रानातला मोर गावात राहतोय गावातले गावपण उघड्या डोळ्याने पाहत आहेत. चिमणी,कोंबड्यांसोबत त्याची चांगलीच गट्टी जमली आहे. मुले देखील चांगले दोस्त बनत आहेत. जेव्हा शाळेला सुट्टी असते. दिवसभर गावात आणि रात्री झाडावर असतो. रागावण्याचा आघावपणा त्याच्याजवळ नसतो. रुबाबदार,देखणा राष्ट्रीय पक्षी आता गावकरीच झालाय प्रेम अन् मायेनं तो माणसाजवळ आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT