खळबळजनक! माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून रिव्हॉल्वर चोरीला Saam Tv
मुंबई/पुणे

खळबळजनक! माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून रिव्हॉल्वर चोरीला

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून रिव्हॉल्वर चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना चोरट्याने चांगलाच हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा (car) दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यामधील १ लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर (Revolver) चोरुन नेले आहे. याप्रकरणी रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैदय स्टेडियम दरम्यान हा चोरीचा (Theft) धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे देखील पहा-

नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याविषयी बागवे यांना समजू शकले नाही. त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर कारमधील ड्रायव्हर सीटच्या शेजारील सीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवले असलेले १ लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर लंपास केले आहे.

याबाबत रमेश बागवे यांनी दिलेल्या माहितीनुसार की, आपण कारमधील सीटच्या मागील कप्प्यात रिव्हॉल्व्हर ठेवले होते. २८ डिसेंबर दिवशी दिवसभर विविध कार्यक्रम होते. त्या दरम्यान, चोरट्याने कारमधून हे रिव्हॉल्व्हर ल्माप्स केले आहे. काही वेळेने हा रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरात देखील सर्व ठिकाणी शोधले. त्यानंतर आता खडक पोलिसाकडे (police) फिर्याद देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Monday Horoscope : मानसिक ताण जाणवेल, शंकराच्या कृपेने अडथळे दूर होतील; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Unique Beach : चमकणारं पाणी अन् गायब होणारा समुद्र! भारतात आहे मालदीवपेक्षाही युनिक बीच

SCROLL FOR NEXT