Farmer Suicide Attempt Opposite Mantralaya Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्महदनाचा प्रयत्न; स्वतःला पेटवून घेतल्याने शेतकरी गंभीर जखमी

Farmer Suicide Attempt Opposite Mantralaya: हा शेतकरी सातारा येथील असून त्याचं नाव सुभाष भानूदास देशमुख, वय - ४५ असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सुरज सावंत

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना (Farmers) अनेक आश्वासनं देण्यात आली होती. मात्र, ती पुर्ण न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. आज, मंगळवारी एका शेतकऱ्याने चक्क मंत्रालयासमोरच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला (Burn) पेटवून घेतले. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी आग विझवली, या आगीमुळे हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली, सध्या या जखमी शेतकऱ्याला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Farmer Suiceide Attempt News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, हा शेतकरी सातारा येथील असून त्याचं नाव सुभाष भानूदास देशमुख, वय - ४५ असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. त्याचप्रमाणे आणखी एका ८८ वर्षांच्या शेतकऱ्यानेही आत्महदनाचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भगवान नारायण भुसारे वय वर्ष ८८ रा. कौडगांव, जि. उस्मानाबाद इथून हा ८८ वर्षांचा वयोवृद्ध शेतकरी आला होता.

यावेळी शेती विषयक प्रश्नांच्या मागण्यासाठी आत्मदहन करण्यासाठी ते आले होते. पोलिसांनी त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले आणि त्यांच्या ताब्यात असलेले ज्वलनशील पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT