Pune Accident Saam TV
मुंबई/पुणे

दारुच्या नशेत कार चालकाची २ दुचाकीस्वारांना धडक, सिंहगड रस्त्यावरील घटना

कारच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) नांदेड सिटी सर्कलजवळ काल रात्री दारूच्या नशेत कार चालवत असलेल्या चालकाने २ दुचाकीस्वारांना धडक दिली आहे. कारच्या धडकेत (Accident) दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्या दोघांनाही उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

योगेश पवार व विपील हळदकर अशी कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावं आहेत. हवेली पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अमेंद्र सिंग रा.ललित, सी- ४०६ हा कारचालक दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा परिवार देखील कारमध्ये होता.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, कार नांदेड सिटी (Nanded City) येथील सर्कलजवळ आली असता कारचालकाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये योगेश पवार व विपील हळदकर हे जखमी झाले. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं असून त्यांच्यावरती सध्या सुरू आहेत. या अपघातामध्ये दुचाकींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

कारचालक अमेंद्र सिंग याला हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं आहे. हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT