Pune MNS News Saam TV
मुंबई/पुणे

Pune MNS News: पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; कंत्राटदाराला पैसे मागितल्याचा आरोप

Pune Extortion Crime: पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला जातीवाचक शिवीगाळ करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही | पुणे १२ डिसेंबर २०२३

Pune MNS Worker Extortion Crime

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला जातीवाचक शिवीगाळ करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद गवळी असं गुन्हा दाखल झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रल्हाद गवळी हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यातील निकटवर्तीय मानला जातो. गवळीच्या अनेक उपक्रमांमध्ये राज ठाकरे पुण्यात नेहमी हजेरी लावत असतात. त्याच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गवळी याने तक्रारदार विजय कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर खंडणीची देखील मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, स्वारगेट पोलिसांनी गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शिरूर येथील मनसेचा जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष असलेल्या सुशांत कुटे याच्यावर खंडणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कपिल धनिलाल यादव यांच्या पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

संकल्प इंजिनिअरिंग प्रा.लि. कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख कपिल धनिलाल यादव (रा. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, एक वर्षांपूर्वी आरोपी सुशांत कुटे हा करंदी येथील कंपनीच्या गेटवर येऊन त्याने कंपनीतील कंत्राट मागितले. याच मागणीचा त्याने पाठपुरावा करून त्याने दर महिन्याला दोन लाखांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT