Anil Parab Latest Marathi News,
Anil Parab Latest Marathi News,  Saam Tv
मुंबई/पुणे

Anil Parab : शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

साम टिव्ही ब्युरो

Anil Parab News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Anil Parab Latest News)

अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपकाही किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे. रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर परब यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. इतकंच नाही तर, परबांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, आता अनिल परब यांच्यासह इतरांविरोधात रत्नागिरीच्या दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपकाही किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT