Suicide News Dombivali प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivali News: स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून केबल व्यावसायिकाची आत्महत्या

Dombivali Crime News : २ आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रदीप भणगे

डोंबिवली: केबल व्यावसायिकाच्या जाचाला कंटाळून प्रल्हाद पाटील या व्यक्तीने ट्रेन खाली आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. केबल व्यावसायिकांनी दिलेल्या त्रासामुळे आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे आपण ही आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ (Video) प्रल्हाद यांनी शुट केला होता. त्यानंतर रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी व्हिडिओ आणि सुसाईड नोटांच्या आधारे या प्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी २ आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. (Dombivali Crime News)

डोंबिवली जवळील संदप गावातील एका ४५ वर्षांच्या केबल व्यावसायिकाने गावातील केबल व्यावसायिक असलेल्या १५ स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी दातिवली-निळजे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका एक्सप्रेस समोर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिकाने मोबाईलद्वारे व्हिडिओ तयार करुन तो आपल्या भावाला पाठवला होता. याशिवाय, मयताने लिहिलेल्या मृत्युपूर्वीच्या दोन चिठ्ठ्या ठाणे, दिवा रेल्वे पोलिसांना मिळाल्या आहेत.

केबल व्यावसायिकाने मृत्यूपूर्व तयार केलेला व्हिडिओ त्याने लिहिलेल्या स्वतःजवळील आणि घरातील दोन चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चिठ्ठीतील नावांप्रमाणे पोलिसांनी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी व्हिडिओ आणि सुसाईड नोटांच्या आधारे या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी २ आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपींची नावे -

आरोपींमध्ये गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या संदीप गोपीनाथ माळी (रा. भोपर गाव), कुंदन गोपीनाथ माळी (रा. भोपर), संदीप उर्फ पिंट्या कान्हा पाटील (संदप), रणदीप उर्फ भाऊ कान्हा पाटील (संदप), हेमंत कान्हा पाटील (संदप), चेतन कान्हा पाटील (संदप), योगेश मधुकर पाटील (संदप), प्रथमेश संतोष पाटील (संदप), मधुकर कृष्णा पाटील (संदप), दत्तात्रय कृष्णा पाटील (संदप), प्रवीण पुंडलिक पाटील (संदप), हर्षल दत्तात्रय पाटील (संदप), ऋतिक बळीराम पाटील (संदप), आस्थिक उर्फ लंकेश बळीराम पाटील (संदप) यांचा समावेश आहे.

असा घडला प्रकार -

शनिवारी, १० सप्टेंबरला प्रल्हाद हे नेहमी प्रमाणे सकाळी कार्यालयात गेले. ते नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेपर्यंत घरी न परतल्याने त्याची पत्नी सपना यांनी आपल्या भावजयला फोन करुन कळविले. तात्काळ प्रल्हादचे भाऊ शिवदास त्याचा तपास करु लागले. प्रल्हादने आपणास आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ पाठविला असल्याचे शिवदासच्या निदर्शनास आले.

उसरघर गावचे दिनेश संते यांनी प्रल्हादच्या भावांना संपर्क करुन प्रल्हाद जखमी अवस्थेत दातिवली-निळजे दरम्यान रेल्वे मार्गात पडले आहेत असे कळविले. त्यांना मुंब्रा येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. दिवा, ठाणे पोलिसांनी मयत प्रल्हादची झडती घेतली. त्यांच्याजवळ आणि घरात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. 

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT