पुण्यात 75 तास लसीकरणाची मोहीम राबवणार - अजित पवार Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात 75 तास लसीकरणाची मोहीम राबवणार - अजित पवार

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अजित पवार यांनी आज घेतला.

अमोल कविटकर, पुणे

अमोल काविटकर

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी घेतला. या आढावा नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सीएसआर फंडातून 5 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक मतदारसंघात 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पीएमसी PMC मृत्यूदर 1.7 टक्के इतका झाला आहे. पीसीएमसीचा PCMC 1.5 इतका झालाय तर ग्रामीणचा 0.8 इतका झाला आहे. पुढे त्यांनी बोलत असताना माहिती दिली की, गेल्या आठवड्यात 5 लाख नागरिकांचे लसीकरण Vaccination In Pune झाले आहे. तसेच 5 टक्के लसीकरणात वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील पहा-

दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना होणाऱ्यांची संख्या जास्त का?

पुढे त्यांनी पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली आणि सांगितलं की, पहिला डोस घेतल्यानंतर 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली. तर दुसरा डोस घेतल्यानंतर 0.25 टक्के लोकांना कोरोना झाला आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना होणाऱ्यांची संख्या जास्त का याबाबत डॉक्टरांना विचारलं आहे, त्यावर डॉक्टरांनी सांगितलं, दुसरा डोस घेतला की, नागरिक मास्क न घालता मुक्तपणे फिरतात. स्वतःची काळजी घेत नाहीत. त्यामुळे पुन्हा कोरोना होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, कुटुंबाची आणि आपली काळजी घ्यावी अशी विनंती अजित पवार यांनी केली.

सिरींजचा तुटवडा;

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून कोरोना नियमनाचे सर्रास उल्लंघन केलं जात आहे. लसीकरणात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिरींजचा तुटवडा जाणवतोय. नागरिकांनो मास्क वापरा. सिरीनचा तुटवडा, महापालिकेने 1 लाख सिरीन खरेदी केल्या आहेत. पुण्याचा पॉझिटिव्हीटी दर 2.1 टक्के, पिंपरी-चिंचवड 2.2 तर पुणे ग्रामीण 3.8 टक्के इतका आहे अशी माहिती आज अजित पवार देत होते.

तसेच, नॉन कोविड Non Covid आणि कोविड Covid रुग्णालयांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. गेल्या पंधरा दिवसात सक्रीय रुग्णसंख्या 19 टक्क्यांनी घटली आहे. सक्रीय रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. तर नगर जिल्ह्याचे दररोजचे एक हजार टेस्टिंग पुण्यात केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ससूनमधील 40 टक्के कोरोना रुग्ण नगर जिल्ह्यातले आहेत.

सिरीनचा पुरवठा केंद्राकडूनच कमी झाल्याने सिरीनचा तुटवडा जाणवत आहे. स्थानिक पातळीवर सिरीन खरेदी केली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी संस्थांकडून डोस मिळत आहेत, मात्र सिरीन मिळत नाहीत. त्या लसीकरणासाठीही सिरीनची आवश्यकता असते.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी;

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. काही जिल्ह्यात सर्व तर काही जिल्ह्यात ३ ४ तालुकेच बाधित आहेत.

महापुराला जलयुक्त जबाबदार?

असं तज्ञांचं मत आहे, पण यावर अभ्यास करून निष्कर्ष काढला जाईल. समिती नेमणार नाही, वेळ घालवायचा असल्यास समिती नेमतात. योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. असे आज अजित पवारांनी सांगितलं.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT