A Women Died On Fort while taking selfie Saam Tv
मुंबई/पुणे

A Women Died On Fort: सेल्फीचा मोह जीवावर बेतला, २ हजार फुटांवरुन महिला दरीत कोसळली; नवऱ्यासमोरच गेला जीव

Pune Accident News: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबळगड किल्ल्यावर सेल्फी काढताना एका २४ वर्षीय महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Women Died On Prabalgad Fort While Taking Selfie:

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबळगड किल्ल्यावर सेल्फी काढताना एका २४ वर्षीय महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेने महिलेच्या कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest News)

शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (२८ डिसेंबर)ला ही दुर्दैवी घटना घडली आहे. शुभांगी आणि तिचा नवरा प्रबळगडावर फिरण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या कड्यावर शुभांगी सेल्फी काढायला गेली अन् पाय घसरुन पडली. २००० फूट दरीत शुभांगी पडली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी होती. शुभांगीचे विनायक पटेलसोबत ८ डिसेंबर रोजी लग्न झाले होते. हे दोघे हनिमूनसाठी निघाले होते. गुरुवारी सकाळी माची प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. शुभांगी गडाच्या टोकावर सेल्फी काढायला गेली. सेल्फी काढताना तिचा तोल गेला आणि ती दरीत कोसळली. ही संपूर्ण घटना विनायक समोर घडली. या घटनेने विनायकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पनवेल तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडावरील काही ट्रेकर्स आणि सव्यंसेवी संस्थेच्या बचाव पथकाने शुभांगीला वर काडण्यात यश आहे. शुभांगीच्या अंगावर खूप जखमा होत्या . त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जीव गेला आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शुभांगीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT