Nalasopara News 
मुंबई/पुणे

Nalasopara: नाल्यातून वाहून गेलेली १५ वर्षीय मुलगी सापडली थेट उत्तर प्रदेशात; घटनेमुळे परिसरात खळबळ

नालासोपारा धनिवबाग परिसरात राहणारी एक १५ वर्षीय मुलगी सहा दिवसांपुर्वी नाल्यातून वाहून गेली होती.

चेतन इंगळे

मुंबई: नालासोपारा (Nalasopara) धानिवबाग परिसरात राहणारी एक १५ वर्षीय मुलगी सहा दिवसांपुर्वी नाल्यात वाहून गेली होती. बेपत्ता झालेली ती मुलगी आता थेट उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आढळून आली आहे.

दिक्षा यादव असं या वाहून गेलेल्या मुलीचं नाव आहे. १६ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धानिवबागच्या सिद्धिविनायक चाळीत राहणारी दीक्षा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसात घराबाहेर शौचालयास गेली असता, याच वेळी उघड्या नाल्याजवळ तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ -

या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दिक्षाला शोधण्याचं काम सुरू केलं होतं. अनेक प्रयत्न करून, अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन करून देखील दिक्षा हिचा काही थांगपत्ता लागला नव्हता.

मात्र, जवळपास सहा दिवसानंतर आज दिक्षाचा फोन तिच्या आईला आला, ती नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेशमधील गाजीपुर येथे आहे आणि सुखरूप असल्येचं तिने फोनवर सांगितलं आहे. पोलिस यंत्रणा दिक्षाला जवळपास ६ दिवसांपासून शोधत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिक्षा ही नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेश येथे पळून गेली असल्यांच सांगण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty liver disease: लिव्हरवर चरबी जमा झालीये? हे 5 बदल करा, मेणासारखं वितळेल फॅट

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT