Pune Crime गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

धक्कादायक: सिगारेट मागण्याच्या वादातून १५ वर्षांच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या

सुमित आणि त्याच्या मित्रांमध्ये सिगारेट मागण्यावरून किरकोळ वाद झाला आणि या वादातच सूमितच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

गोपाल मोटघरे

पुणे : सिगारेट मागण्याच्या वादातून मोशी येथील जंगलात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना काल दुपारी मोशी (Moshi) टोलनाका येथील जंगलाजवळ घडली आहे. सुमित बनसोडे वय वर्ष १५ असं हत्या झालेल्या मुलाचं नावं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमितच्या मित्रांची कबुतरांची ढाबळ कोणीतरी तोडायला येणार आहे. अशी उडवा उडवीची माहिती सुमित आणि त्याच्या मित्राला मिळाली होती. त्यामुळे सुमित आणि त्याचे मित्र ढाबळ तोडायला येणाऱ्या टोळक्याला मारण्यासाठी कोयते आणि काट्या घेऊन मोशी जकात नाक्याजवळील जंगलात दबा धरून बसेल होतें. मात्र, त्या ठिकाणी ढाबळ तोडणारा टोळकं आलाच नाही.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, हे सर्वजण ज्या ठिकाणी दबा धरून बसले होते. त्याच ठिकाणी सुमित आणि त्याच्या मित्रांमध्ये सिगारेट मागण्यावरून किरकोळ वाद झाला आणि या वादातच सूमितच्या काही मित्रांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार करून त्याचा खून केला आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती ही चिंतेची बाब असून प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला हवी असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT