पुणे ग्रामिणमधील 95 गावं अजूनही कोरोनाचे हॅाटस्पॅाट Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे ग्रामिणमधील 95 गावं अजूनही कोरोनाचे हॅाटस्पॅाट

मागिल काही दिवसात महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) कमी होत आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: मागिल काही दिवसात महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) कमी होत आहेत. त्यामुळे टप्याटप्याने महाराष्ट्रात अनलॅाक (Maharashtra Unlock) करण्यात आले. पॅाझिटिव्हिटीच्या दरावरुन निर्बंध कसे असतील हे ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त केली होती. परंतू, मागच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निर्बंध शिथील करुण व्यापारी वर्गाला दिलासा दिला होता.

पुणे शहर आणि ग्रामिण भागातील कोरोना परिस्थिचा आढावा आज पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 2.57 टक्क्यांवर स्थिर आहे. तर पुणे शहरात 6.96 टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. ग्रामिण भागाचा विचार केला तर पॉझिटिव्हीटी रेट घटून 3.94 टक्क्यांवर आला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे ग्रामिण भागातील 95 गावे अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत.

पुणे शहरात अजूनही 100 टक्के अनलॅाक झालेले नाही. आज सुरु असलेल्या आढावा बैठकीत अजित पवार अजून निर्बंध शिथिल करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुण्यात अजूनही स्विमिंगपुल बंद आहेत. त्याचबरोबर मंदीरं, चित्रपटगृह, नाट्यगृह देखील बंद आहेत. यांना दिलासा मिळतो का? याकडेही पुणेकरांचं लक्ष आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT