मुंबई-आग्रा महामार्गावर 8-10 वाहनांची भीषण धडक; 4 ठार, अनेक जखमी  Twitter/@ANI
मुंबई/पुणे

मुंबई-आग्रा महामार्गावर 8-10 वाहनांची भीषण धडक; 4 ठार, अनेक जखमी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

वृत्तसंस्था

मुंबई . मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर Mumbai Agra National Highway आठ ते दहा वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चार जणांचा 4 Death मृत्यू झाला आहे. वाहनांमध्ये अडकलेल्या अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठी अडचण येत आहे. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्थेनुसार, या अपघातात मारुती बोलेरो कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जोरदार टक्कर होऊन वाहनांच्या नंबरप्लेट पूर्णपणे तुटल्यामुळे वाहनांची व प्रवाशांची माहिती मिळणे कठीण झाले आहे. मध्य प्रदेशातून धुळ्याकडे Dhule जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

बुधवारी (ता.२७) रात्री साडेआठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सेंधवा येथून शिरपूरकडे येत असताना शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातात तीन ते चार चारचाकी व काही ट्रकचा समावेश आहे. या घटनेत चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलीसही मदतीसाठी उपस्थित होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT