pune crime news, kondhwa police station saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : चार कोटींची फसवणूक; पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

इतर संशयितांनी त्यांचे नकाे त्या अवस्थेतील व्हिडिओ शूटिंग केले.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Crime News : व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर संशयिताने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी (kondhwa police) जुगनू ऊर्फ शफीक शेख (वय ४५) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जुगनू शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी आणि शेख यांच्यात २०२० मध्ये भिशीचा व्यवसाय होता. तो बंद झाल्यामुळे आरोपीने फिर्यादी महिलेला दुसरा व्यवसाय सुरू करू, असे सांगितले. त्यासाठी संशयित आरोपीने २०२०-२१ या कालावधीत फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वेळोवेळी ४ कोटी रुपये घेतले.

परंतु त्यांना काहीही पैसे न देता आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी त्यांचे पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपीने फिर्यादी महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. इतर संशयितांनी आरोपींनी त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर पुन्हा संशयित आरोपी शेख याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT