धावत्या टँकरमधून घातक सल्फ्यूरिक ऍसिड अंगावर पडल्याने ४ नागरिक गंभीर जखमी! SaamTvNews
मुंबई/पुणे

धावत्या टँकरमधून घातक सल्फ्यूरिक ऍसिड अंगावर पडल्याने ४ नागरिक गंभीर जखमी!

उल्हासनगरच्या श्रीराम चौकातील घटना

अजय दुधाणे

उल्हासनगर : घातक सल्फ्यूरिक ऍसिड घेऊन जाणाऱ्या भरधाव टॅंकरमधुन 4 नागरिकांच्या अंगावर ऍसिड (Acid) पडल्याने नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगरच्या श्रीराम चौकात घडली आहे. आज दुपारच्या सुमारास उल्हासनगरहुन तळोजा मार्गे हा टँकर जात होता.

हे देखील पहा :

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) श्रीराम चौकात टँकर (Tanker) आल्यानंतर एका स्पिड ब्रेकरवर आदळून टँकरच्या वरती असलेलं झाकण लूज असल्याने त्यातील घातक सल्फ्यूरिक ऍसिड थेट मागे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडलं. ऍसिड अंगावर पडल्याने या दुर्दैवी घटनेत चार जण जखमी (Injured) झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेत चौघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी टँकर चालकाला विठ्ठलवाडी (Vitthalwadi) पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. यात जखमी झालेल्या इसमांची नावे भरत वसीठा आणि दिलीप पुरस्वानी अशी आहेत. तर, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विठ्ठलवाडी पोलिसांनी (Police) सुरू केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT