Navi Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: नवी मुंबईतील 35 हजार झोपडपट्टींचा पुनर्विकास कसा होणार?

साम टिव्ही ब्युरो

>> विनय म्हात्रे

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या एका शहर आणि दुसऱ्या बाजूस एमआयडीसी वसलीय. एमआयडीसीच्या जवळपास 130 हेक्टरवर अनेक वर्षांपासून झोपडपट्टी वसलीय. नवी मुंबईतील एमआयडीसी क्षेत्रात वसलेल्या 35 हजार झोपडपट्टांच पुनर्विकास आता होणार आहे.

आज पासूनच एमआयडीसी च्या 130 हेक्टर वर वसलेल्या झोपडपट्ट्याच बायोमेट्रिक करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. मंत्रालयात आज पार पडलेल्या बैठकीत एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एसआरएचे अधिकारी उपस्थित होते.

येत्या 2 महिन्यात या 35 हजार झोपडपट्टांच बायोमेट्रिक पूर्ण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धोरण जाहीर करणार.. मात्र 2010 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांनाच ही एसआरए स्कीम लागू असणार आहे. (Latest Marathi News)

तसेच सिडकोच्या जागेत वसलेल्या 8 ते 10 हजार झोपडपट्यांबाबत ही रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे ही उदय सामंत यांनी सांगितलंय. ठाणे पाठोपाठ नवी मुंबईत ही एसआरए स्कीम लागू होत असल्याने झोपडपट्टी धारकांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने आता नवी मुंबई झोपडपट्टी मुक्त नवी मुंबई म्हणून भविष्यात ओळखली जाणार असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीला झोपडपट्टी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष विजय नाहटा आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले उपस्थित होते..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT