mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: वृद्ध दाम्पत्याने विश्वासाने नोकरीवर ठेवलं; काही दिवसांनी महिलेचं उघड झालं धक्कादायक कृत्य

Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच एका चोरीचा उलगडा मुंबईच्या समता नगर पोलिसांनी केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच एका चोरीचा उलगडा मुंबईच्या समता नगर पोलिसांनी केला आहे. घरात कोणी नसताना केअर टेकर महिलेने बेडरूम मधील दागिन्यांची चोरी केली. या दागिन्यांची किंमत साडे तेरा लाख इतकी होती. या प्रकरणी समता नगर पोलीसांनी केअर टेकर महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून 90 टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेकडील भूमी आर्किड इमारतीत राहणाऱ्या रेवर दाम्पत्याची देखरेखी साठी एका 26 वर्षीय महिलेची नेमणूक करण्यात आली होती. रेवर दाम्पत्याची मुले आणि नातवंडे मुंबई बाहेर गेल्यानंतर संधी साधली.

आरोपी महिलेने घरात ठेवलेल्या दागिन्यांवर हात मारून गावात लग्नाच्या बहाण्याने रजा घेऊन गायब झाली. काही दिवसांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांनी कपाट उघडले असता दागिने गायब होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरू केला.

पोलिसांच्या तपासात हा चोर दुसरा कोणी नसून घरामध्ये ठेवलेली २६ वर्षीय केअरटेकर महिला असल्याचे निष्पन्न झाले. दागिने चोरलेल्या आरोपी महिलेला बोरिवली येथून अटक केली आहे.

तपासा दरम्यान महिलेने चोरीचा गुन्हा कबूल केला असून तिच्याकडून साडेतेरा लाख रुपये किमतीच्या 265 ग्रॅम सोन्यापैकी 12 लाख 50 हजारांचे 250 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT