Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, आजची आकडेवारी पाहा

गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत (corona new patients) मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

मुंबईतील नव्या कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या नव्या २३६६ रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा १०८७३२६ वर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मु्ंबईत आज दिवसभरात कोरोनाचे २३६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत आज दोन रुग्णांचा मृत्यू (corona death) झाल्याने कोराना मृतांची संख्या १९५७८ वर पोहोचली आहे.

मुंबईत १३००५ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०५५६६५ वर गेली आहे. तसेच दिवसभरात १७०० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के एवढा झाला आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४१९ दिवसांवर पोहोचला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT