22-foot Ganesh idol collapses during Mumbai procession Saam TV Marathi
मुंबई/पुणे

गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट, २२ फुटी बाप्पाची मूर्ती अचानक कोसळली, २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

Mumbai Ganesh idol collapse : मुंबईतील भुलेश्वरमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान २२ फुटी गणपतीची मूर्ती अचानक कोसळली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले.

Namdeo Kumbhar

22-foot Ganesh idol collapses during Mumbai procession : गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना मुंबईतील भुलेश्वर परिसरात घडली आहे. भायखळ्याहून मोठ्या थाटामाटात आणल्या जाणाऱ्या 'भुलेश्वरच्या राजा'ची २२ फूट उंच मूर्ती मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असताना अचानक समतोल बिघडून कोसळली. या भीषण दुर्घटनेत दुर्दैवाने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे बाप्पाच्या आगमनाचा आनंद क्षणात शोकात बदलला असून संपूर्ण भुलेश्वर परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री १० वाजता भुलेश्वरमधील डॉ. आत्माराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय आंबे चौक येथे भुलेश्वरच्या राजा गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान २२ फुटांपेक्षा जास्त उंचीची गणपतीची मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एकाची ओळख गणपती मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे अशी पटली आहे. अध्यक्षासह ३८ वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्ती लालबागहून भुलेश्वरला नेली जात होती. तिचे तीन तुकडे झाले आणि नंतर मंडळाच्या सदस्यांनी ती एका डम्परवर ठेवून विसर्जनासाठी नेली, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “मूर्तीला आधार देणाऱ्या फ्रेमचे वेल्डिंग बहुधा व्यवस्थित झाले नव्हते. त्यामुळे, मूर्ती फ्रेममधून मधून निसटून खाली पडली. ते जवळपास मंडपाजवळ पोहोचले होते, तेव्हा ही घटना घडली. जखमी झालेले लोक बहुधा मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीवर बसले होते.” सात जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sunday Horoscope : नव्या गोष्टी अनुभवाल, या ५ राशींचा ताण वाढणार की कमी होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

मगरीच्या हल्ल्याचा थरार, आईसाठी मुलगी थेट मगरीशी भिडली

भारतात 2027 मध्ये कमी पाऊस, 100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती

I Phone चे हप्ते थकले, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT