Bhayander Police Station चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Crime News: भाईंदरमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीची हत्या; सावत्र बापाला अटक

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून चिमुकलीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. अहवालात चिमुकलीचे तोंड व गळा दाबून श्वास कोंडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी आदिल याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई - भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वर्षाच्या चिमुकलीची तोंड व गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी आदिल खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. भाईंदर (Bhayander) पश्चिममधील मुर्धा गावमध्ये पूजा राहत असून, २०१५ मध्ये अमित वाघ यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना एका मुलीचा जन्म झाला. पुन्हा एकदा २०१९ मध्ये पूजा गर्भवती राहिली. (Navi Mumbai Crime News)

हे देखील पहा -

मात्र, पूजा यांचे वारंवार अमित यांच्यासोबत वाद होत असल्यामुळे पूजा यांनी अमित त्यांच्याशी घटस्फोट घातला. त्यानंतर आदिल खान नामक युवकाशी प्रेमसंबंध झाल्यानंतर आदिल सोबत आपला संसार थाटला. आदिल हा रिक्षाचालक असून पूजा कॅटरिंगचे काम करते. २ जानेवारी रोजी पूजा कामावर मिरारोड येथे गेली असता, आदिलचा फोन आला की चिमुकली पडली असून, तिच्या डोक्याला मार लागला आहे. पूजाने तत्काळ रिक्षा पकडून भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात चिमुकलीला दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पूजाच्या तक्रारीनंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून चिमुकलीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. अहवालात चिमुकलीचे तोंड व गळा दाबून श्वास कोंडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी आदिल याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT