Mumbai News: मुंबईमध्ये बेस्टच्या दोन बस (BEST Buses) आणि रिक्षामध्ये भीषण अपघात (Bus And Auto Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास गोरेगाव (Goregaon) येथे ही घटना घडली. या अपघाताचा तपास वनराई पोलिसांकडून (Goregaon Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोरेगाव चेकनाका परिसरात दोन बेस्ट बस आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये रिक्षावाला आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जॉनी सखाराम आणि सुजाता पंचकी असे अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत.
बेस्ट बस क्रमांक - 1453, BD:- 014369, चालक संतोष विष्णू देवूलकर (53 वर्षे) आणि बस क्रमांक 1862, BD:- 009608, चालक संतोष शंकर घोंगे (45 वर्षे) हे दोन्ही बस चालक आपापल्या बसेस पोईसर डेपोतून घाटकोपर डेपोकडे आगार हस्तांतरणाच्या उद्देशाने घेऊन जात होत्या. त्याचवेळी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वेस्टन एक्स्प्रेस हायवेजवळील गोरेगाव चेकनाका येथे या दोन्ही बसचा ब्रेक न लागल्यामुळे जोरदार अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही बसच्यामध्ये रिक्षा (एमएच 02 ईक्यू 9371) आली.
या अपघातामध्ये रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखीम झाले तर रिक्षा चालक देखील जखमी झाला. त्यांना उपचारासाठी तात्काळ ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान जॉनी सखाराम यांचा मृत्यू झाला. तर सुजाता पंचकी यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये रिक्षाचालकाच्या डाव्या गालाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.