Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: सावधान! जेली फिशचा डंख ठरू शकतो जीवघेणा; जलतरणपटूच्या स्वप्नांना ब्रेक

जलतरणपटूचे कसेबसे वाचले हात; दोन महिन्यात तब्बल सात शस्त्रक्रिया

Prachee kulkarni

Pune News : स्विमींगमधलं आपलं उज्ज्वल करिअर वाचवण्याची धडपड करणाऱ्या एका राष्ट्रीय जलतरणपटूच्या चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे. पुण्यातील 18 वर्षीय गीता मालुसरेला एका स्पर्धेत पोहताना जेलीफीशचा दंश झाला आणि हात काढून टाकण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या डॉक्टरांचे उपचार आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीता पुन्हा एकदा पाण्यात पोहण्याचं स्वप्न पाहतेय.

राष्ट्रीय जलतरणपटू गीता महेश मालुसरेला डिसेंबर महिन्यात इस्त्राईलला होणाऱ्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. सरावासाठी गीताने नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीतल्या स्विमींग स्पर्धेत भागही घेतला. गीता या स्पर्धेत दुसरी आली. पण पोहताना पाण्यामध्ये जेलीफिशने तिच्या हाताचा चावा घेतला आणि हात वाचवण्यासाठी गीता गेले दोन महिने धडपडत आहे.

गेल्या दोन महिन्यात गीताच्या हातावर एक दोन नाही तर तबब्ल सात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या जेलीफिशच्या चाव्यानंतर आपला हात वाचवण्यासाठी आणि पुन्हा पाण्यात सूर मारण्यासाठी गीता संघर्ष करतेय. पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिची भेट घेतली. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि तिची जिद्द याच्या जोरावर संकटातून बाहेर आल्याबद्दल दोघांचंही कौतुक चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये शेतजमिनीच्या रस्त्यावरून वाद

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT