पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, डोक्याला गोळी लागून मुलाची हत्या...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, डोक्याला गोळी लागून मुलाची हत्या...(पहा व्हिडिओ)

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही. महिन्याभरामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराच्या घटना चांगल्याच घडत आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये एका १७ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडिओ-

जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर मध्यरात्री १२: ३० वाजेच्या सुमारास नॅशनल हॅवी कंपनीसमोर १७ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक मुलाचे नाव दशांत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक मुलगा हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही अखेर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या मुलाचा मृतदेह नॅशनल हॅवी कंपनीसमोर आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचेही दिसून आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात मोठी भर; दोन वर्षांत ४९ किलो सोनं दान|VIDEO

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

SCROLL FOR NEXT