Bus Accident On Mumbai Pune Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसला भीषण अपघात, १५ प्रवासी गंभीर जखमी

Bus Accident On Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मळवली गावाच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास हा अपाघात झाला. या अपघातामध्ये बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

Priya More

दिलीप कांबळे, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मळवली गावाच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास हा अपाघात झाला. प्रवासी बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त बस पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने बसला धक दिली. अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

बसमधील प्रवासी साखर झोपेमध्ये असताना हा भीषण अपघात झाला. ही धडक इतक्या जोरात होती की या अपघातामध्ये बसमधील सर्वच प्रवास जखमी झाले. यामधील १५ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातामध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

Sleep Mistakes : गाढ झोप झाली तरी सकाळी उठल्यावर डोकं का भणभणतंय? 'या' ५ गंभीर चुका ठरू शकतात कारणीभूत

Maharashtra News Live Update: ठाण्यातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्यादिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? १ तोळा सोन्याचे इतके आहेत दर; वाचा 24K,22K,18Kचे ताजे दर

SCROLL FOR NEXT