पुण्यात खळबळ! एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीचा खून SaamTv News
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ! एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीचा खून

पुण्यात कबड्डी पट्टू तरुणीचा एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करत तीन नराधमांनी खून केल्याची घटना बिबेवाडीचा यश लॉन्स वरती घडली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: पुण्यात कबड्डी पट्टू तरुणीचा एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करत तीन नराधमांनी खून केल्याची घटना बिबेवाडीचा यश लॉन्स वरती घडली आहे. आज सायंकाळी कबड्डी खेळण्यासाठी गेलेल्या क्षितिजा अनंत व्यवहारे या 14 वर्षीय मुलीचा तिघांनी कोयत्याने गळा चिरत खून केला आहे. पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तरुणीच्या खूना प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी रवाना झालेले आहेत.

क्षितीजी आज सायंकाळी मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला बोलावले व तिच्याशी बोलायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद सुरु झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने खून केल्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून तेथून पळ काढला. दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु वार करत असताना त्याला ते काढता आले नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT