बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे हादरले! 12 वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुण्यात घरात घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न दोघांनी केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा हादरवणारी घटना शहरात घडली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे, गोपाल मोटघरे

अश्विनी जाधव केदारी, गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यात घरात घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न दोघांनी केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा हादरवणारी घटना शहरात घडली आहे. एका सार्वजनिक शौचालयात १२ वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक ते माल धक्का दरम्यान असलेल्या सार्वजनिक शौचालयात ही संतापजनक घटना घडली. १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हे देखील पहा-

शौचालयाच्या आतमधील छोट्याशा भागात पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहत आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीनं तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल आहे. त दरम्यान पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आणि त्यानंतर पीडित मुलीच्या आईने बंड गार्डन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी बंड गार्डन पोलीसांनी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगल्या ओळखीचा आहे. तो दरदिवशी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. मात्र हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. आता बंड गार्डन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नगरच्या कांदा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

Fatty liver in women: नोकरी करणाऱ्या 3 पैकी एका महिलेला फॅटी लिव्हरचा धोका; दारू न पिता यकृतात चरबी का साठतेय? जाणून घ्या कारणं

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

SCROLL FOR NEXT