Eknath Shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिवसेनेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटाला दिला पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते शिंदे गटात सामील झाले आहेत. सेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (Shivsena Political Crisis News IN Marathi )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या १२ खासदारांच्या निर्णयाचं स्वागत केलं. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, 'भाजप-शिवसेना सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढले. त्यामुळे महिन्याभरात निर्णय घेतला. खरंतर अडीच वर्षांपूर्वी निर्णय घ्यायचा होता, तो आता घेतला. आमच्या सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला, शेतीसंबंधीत निर्णय घेतले असे लोकहिताचे निर्णय घेत आहेत. आमच्या सरकारला केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पाठिंबा दिला आहे'.

'लोकांचे सरकार कुठेही कमी पडणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचं खासदारांनी स्वागत केलं आहे. लोकसभेत शिवसेनेच्या १२ खासदारांनी स्वतंत्र्य गट स्थापनेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. १२ खासदारांनी लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सदर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊतांनी काही खासदारांवर केलेल्या आरोपावर प्रश्न शिंदेंना केला. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,'संजय राऊतांनी खासदारांवर केलेल्या आरोपावर बोलण्याची माझी आवश्यकता नाही. सकाळचा मॅटिनी शो बंद झाला आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना लगावला. उद्या दिल्लीत ओबीसी आरक्षणावरून महत्वाची बैठक आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT