Gunaratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी आंदोलकांना जामीन

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आंदोलकांना जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवरील हल्ला प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आंदोलकांना जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना जामीन मिळाला असला तरी, ते कोठडीतच राहतील.

हे देखील पाहा -

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणात एसटी कर्मचारी (ST Employee) संपाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे. तसेच ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन दिला आहे.

मात्र, सदावर्ते यांना शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांना इतर प्रकरणांमधून दिलासा मिळाला नाही. सदावर्ते यांच्यावर साताऱ्यासह कोल्हापूर येथे मराठा आरक्षणादरम्यान छत्रपतींच्या वंशजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणाचे गुन्हे नोंद असून ते सध्या कोल्हापूर मध्ये पोलीस कोठडीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT