Mumbai corona update SAAM TV
मुंबई/पुणे

मुंबईतील कोरोनाची आजची आकडेवारी दिलासा देणारी, नव्या रुग्णसंख्येत घट

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मुंबईतली आजच्या आकडेवारीनं दिलासा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आजच्या आकडेवारीनं दिलासा दिला आहे. काल रविवारी मुंबईत कोरोनाच्या १८०३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच दोन कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला होता. परंतु, आज मात्र कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज मुंबईत दिवसभरात (corona new patients) १११८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईकरांना (Mumbai) थोडाफार दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोना मृतांची (corona deaths) संख्या १९५७३ वर स्थिरावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज सोमवारी दिवसभरात १११८ रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०८०९४३ वर पोहोचली आहे. तर १०५००३९ एवढे रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे एकूण ११३३१ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण १७, ४८० इतकी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,४७, ८७१ झाली आहे. तर आज राज्यात ७७४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्तांची ७७,४७,१११ इतकी संख्या झाली आहे. राज्यात कोरोनाने बरे होणाऱ्यांचा दर ९७.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात मृत्यू दर १.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT