लोणी काळभोर गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pune: बापाच्या मित्राने केला 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार; पीडिता 4 महिन्यांची गर्भवती

लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना

गोपाल मोटघरे

पुणे : अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारू पाजून मारून टाकील व आईला काहीतरी करील अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. यामुळे अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका पंचवीस वर्षीय तरूणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनु ऊर्फ सिध्दराम भालेराव (वय- 25, रा. बोरकर वस्ती, उरळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी माहिती दिली की, पिडीत मुलीचे आई वडील दोन बहिणी व एक भाऊ यांच्याबरोबर येथे राहत होते. वडील मजुरी तर आई मिळेल त्या ठिकाणी धुनी भांडी करत असे, असा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. भालेराव याची सदर कुटुंबाशी ओळख होती त्यामुळे पिडीतेच्या घरी त्याचे येणेजाणे सुरु होते.

ता. 6 मुरोजी पीडित मुलीने आपल्या आईस पोटात दुखत असल्याचे सांगितले. तेव्हा पिडीत मुलीला चिंचवड या ठिकाणी एका रुग्णालयात घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घरी आल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मुलीने सोन्या भालेराव याने माझ्यासोबत लैंगिक प्रस्थापित संबंध केले असे सांगितले.

हे देखील पहा-

पुढे पीडितेने सांगितले की, याबाबत जर कोणाला सांगितले तर वडिलांना दारू पाजून मारून टाकेल व आईला सुद्धा काहीतरी करेल अशी धमकी दिली त्याने दिली होती. आणि त्यामुळे मी कोणाला काहीही सांगतले नाही असं तिने आपल्या आईला सांगितले. यानंतर पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौघुले या करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT