Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

१०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

सुरज सावंत

मुंबई: १०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलकीवर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे.

अनिल देशमुख हे जवळपास ११ महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांनी वारंवार जामीन देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. अखेर त्यांचा जामीन अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन दिल्यामुळे देशमुखांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे. १०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

ईडीच्या अटकेनंतर ते जवळपास ११ महिने तुरुंगात होते. आज त्यांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुख नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते. दरम्यान, आज ईडीच्या गुन्ह्यात देशमुखांना दिलासा मिळाला असला तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हात त्यांना जामीन मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT