Jalana Crime लक्ष्मण सोळुंके
मुख्य बातम्या

जालना जिल्ह्यात एटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार !

जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर पोलिस आणि चोरांचा थरार पहायला मिळाला आहे. रेनॉल्ड कंपनीच्या डस्टर कार मधून एटीएम चोरले जात असल्याची माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या crime branch टीमला मिळाली होती

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर पोलिस आणि चोरांचा थरार पहायला मिळाला आहे. रेनॉल्ड कंपनीच्या डस्टर कार मधून एटीम चोर जात असल्याची माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या crime branch टीमला मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकणात पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. Shooting by police while pursuing an ATM thief

हे देखिल पहा

भोकरदन शहरातील जाफ्राबाद रोड वरील केळणा नदी पत्रावर या चोरांनी पोलिसांवर शस्त्र काढून वार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला, या आवाजाने परिसरात एकाच खळबळ उडाली होती.

भोकरदन शहरापासून बऱ्याच अंतरापर्यंत पोलिसांनी या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, चोरट्यानी रेनॉल्ड डस्टर गाडी सोडून पळ काढला. अशी माहिती सामोर आली आहे, घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे चोरटे भोकरदन शरातील आलापूर परिसरात लपले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

Edited By - Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Brother : शहनाज गिलच्या भावाची ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्री, सिद्धार्थ शुक्लाचं नाव पुन्हा चर्चेत!

ITR Filling 2025: उत्पन्न एक रूपयाही नाही, तरीही आयटीआर भरावा का? आयकर विभागाचा नियम वाचा

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Gold Rate : पिवळ्या धातूची चमक कायम, नव्या उच्चांकावर पोहचलं, वाचा आजचे दर

Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT