pramod jathar 
मुख्य बातम्या

दोन कटाप्पांनी बाहुबलीला मारले; जठारांचा मंत्र्यांवर राेख

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा jan aashirwad yatra उद्यापासून (शुक्रवार) रत्नागिरीतुन सुरू होणारा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जन आशीर्वाद यात्रा सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाेहचेल. त्यानतंर दाेन दिवस म्हणजेच (ता. २८ व ता. २९ ऑगस्टला) ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहील अशी माहिती प्रमाेद जठार pramod jathar यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान यावेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा घात त्यांच्याच सहका-यांनी केल्याचा दावा केला आहे.

जठारांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या व्हायरल व्हिडिआे क्लिपमधील परब यांच्या उजव्या व डाव्या बाजूस बसलेल्यांवर राेख धरला. ते म्हणाले अनिल परब यांच्या उजव्या व डाव्या बाजूला बसलेल्या दोन सहकाऱ्यांनी त्यांचा घात केला आहे. या दोन कटाप्पांनी बाहुबलीचा घात केला असे सांगून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते म्हणाले जिल्हा नियाेजन बैठकीत परब बाेलत असताना तेही कॅमेरा सुरू असताना का माईक सुरू ठेवला, सहकारी का प्रश्न विचारत होते, अख्या जगाने हे पाहिले आहे. आम्ही देखील सीबीआयची चौकशीची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे. त्या क्लिपमध्ये दिसून येईल अनिल परब कसे रत्नागिरी पाेलिस अधीक्षकांवर दबाव टाकत होते.

नारायण राणेंची त्यांना का भीती वाटत होती, जन आशीर्वाद यात्रा का थांबवायची होती, या मोगलांच्या सरकारला का भीती वाटत हाेती असे प्रश्न प्रमाेद जठारांनी उपस्थित केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT