गोपीचंद पडळकर यांची महाविकास आघाडीतल्या OBC नेत्यांवर टीका Saam Tv
मुख्य बातम्या

आघाडीतील ओबीसी नेते 'काका-पुतण्यां'च्या ताटाखालचे मांजर - पडळकर

महाविकास आघाडी सरकार मधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

विजय पाटील

सांगली : महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi सरकार मधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी OBC नेत्यांचे माकड झाले आहे. या ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही, अशी जहरी टीका भाजप BJP आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केली आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते. Gopichand Padalkar Criticism on OBC Leaders in Government

पडळकर म्हणाले, "ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर देत महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या निवडणुका मध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे. मी फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील,'' 

जो पर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र मध्ये निवडणूक होणार नाहीत, अशी भीम गर्जना महाविकास आघाडीतील नेत्यांमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्यांच्या शब्दाला मातीमोल किंमत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,'' असेही पडळकर म्हणाले.

ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? असा सवाल उपस्थित करत या सर्व प्रश्नावर महाराष्ट्र मधील ओबीसी समाज जागृत झाला आहे, येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत  या सरकारला जागा दाखवणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT