Flying squad officials inspecting seized sarees allegedly meant for voter inducement ahead of ZP elections in Kolhapur. Saam Tv
महाराष्ट्र

झेडपी निवडणुकीत मतदारांना आमिष; उमेदवारांचे फोटो असलेल्या साड्यांचा ट्रक भरारी पथकाने पकडला

Zilla Parishad Election Voter Bribery Case In Kolhapur: झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात मतदारांना आमिष दाखवण्यासाठी साड्या वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच आता झेडपी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस पाडला गेला आणि त्यामध्ये अनेकजण भिजले. कुठेही दुष्काळ नव्हता. पाऊस इतका होता की अक्षरशः महापूर आला होता. मतदारांना कुठे चांदीच्या वाट्या, कुठे वॉशिंग मशीन तर काही ठिकाणी 9 ते 10 हजारांनी एकेक मत विकत घेतल्याचा प्रकार दिसून आला. आता झेडपी निवडणुकीत मतदारांना पुन्हा साड्या वाटून आमिष दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात भरारी पथकाने संशयास्पद टेम्पो अडवत तपासणी केली. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्यांच्या पिशव्या आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील महिला मतदारांना या साड्या वाटप केल्या जाणार होत्या. विशेष म्हणजे या साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही साड्यांची वाटप प्रक्रिया निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

भरारी पथकाने सुमारे सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीदरम्यान आमिषाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT