varun sardesai saam tv
महाराष्ट्र

Nanded: सिनेट सदस्यांच्या निवडणूकीत भगवा फडकणार : वरुण सरदेसाई

राज्यभरात युवा सेनेचे मेळावे सुरु आहेत.

संतोष जोशी

नांदेड : युवा सेना (Yuva Sena) राज्यातील सर्वच विद्यापीठात (university) होणाऱ्या सिनेट सदस्यांची निवडणूक लढवणार असल्याची माहिती युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (varun sardesai) यांनी दिली. युवा सेनेची सदस्य नोंदणी आणि सिनेट निवडणुकां (election) डोळ्यासमोर ठेवून युवा सेना राज्यभर निश्चय मेळावा घेत असल्याचे सरदेसाई यांनी येथे (nanded) नमूद केले. या निवडणुकांमध्ये भगवे वादळ दिसेल असेही सरदेसाईंनी स्पष्ट केले (varun sardesai latest marathi news)

सरदेसाई म्हणाले युवा (youth) वर्ग युवा सेनेचे कार्य पाहून माेठ्या प्रमाणात सेनेकडे (shivsena) आकर्षित हाेत आहे. येत्या १५ एप्रिलपासून राज्यव्यापी सदस्य नाेंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभर दाैरा देखील सुरु आहे.

दरम्यान नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात युवा सेनेच्या मेळाव्यात सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळातील राज्यातील सर्व विद्यापीठांतील सिनेट निवडणुका युवा सेना लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी. सदस्य नाेंदणीच्या माध्यमातून सरकार (maharashtra government) करीत असलेल्या कामाची माहिती युवा वर्गापर्यंत पाेहचवावी असेही सरदेसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT