Eknath shinde and aditya thackeray  saam tv
महाराष्ट्र

ज्या ३३ देशांनी तुमची नोंद घेतली, ती गद्दार म्हणूनच...; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली.

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सध्या निष्ठा यात्रेदरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं. दरम्यान, माध्यमांसोबत संवाद साधत असताना त्यांनी बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकाही केली. ज्या ३३ देशांनी तुमची नोंद घेतली आहे, ती गद्दार म्हणूनच घेतली आहे. असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. (Aditya Thackeray vs CM Eknath Shinde)

आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'बंडखोर आमदार म्हणतात की, आमच्या उठावाची तब्बल ३३ देशांनी नोंद घेतली. अहो ज्या ३३ देशांनी तुमची नोंद घेतली ती गद्दार म्हणूनच घेतली'. एवढंच नाही तर आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांना चॅलेंजही दिलं.

तुम्ही तिकडचे बननू राहा पण आमदारकी आणि खासदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा जनता जो कौल देल तो मान्य आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ज्या आमदार तसेच खासदारांना ज्यांना आपण चुकलो असे जराही वाटत असेल तर त्यांनी परत यावं मातोश्रीची दारं त्यांच्यासाठी नेहमी उघडी आहे. असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Eknath Shinde News)

ही गद्दारी तुम्हाला पटणारी आहे का?

मला ऐवढच विचारायचं आहे जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणारं आहे का? ही गद्दारी तुम्हाला पटणारी आहे का? ज्या खासदारांना मी मित्र मानलं त्यांच्यासोबत फिरलो. मानसन्मान दिला, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला काय कमी केलं यांना. यांनी जेव्हा फंड मागितला तेव्हा दिला. याच्यावर विश्वास ठेवला ती आमची चूक झाली का? हे अपेक्षित नव्हतं . यांना मिठित घेताना डोळे बंद असताना पाठीत खंजीर खुपसला. हे राजकारण इतकं खालच्या पातळीचं गेलंय की मी तरुणांना कसे सांगू की तुम्ही राजकारणात या. आदित्य ठाकरेंचं हे भाषण ऐकून शिवसैनिकांचे मन गहिवरून आले होते. (Aditya Thackeray News)

ठाकरे कुटुंब एकटे पडणार नाही

मी रात्रभर फिरत आहे. लक्ष देखील देत नाही. शिवसेना आणि ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा कट हे सगळे ४० गद्दार करत होते. एकट पाडण्याचे प्रयत्न पुरेपूर चालले आहेत. मात्र, राज्यातील जनता आणि शिवसैनिक ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला कधीच एकटे पाडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुंलासाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT