youth beats congress leader in chandrapur Saam Tv
महाराष्ट्र

Crime : काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला; सर्वपक्षीय नेत्यांची रुग्णालयात धाव

हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आला आहे.

संजय तुमराम

चंद्रपुर : मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. नागरकर हे जिल्ह्यातील (chandrapur) काँग्रेसचे (congress) नेते आहेत. त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे येथील काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेचा पोलिसांनी (police) तपास सुरू केला आहे. (chandrapur latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार तीन युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला आहे. नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भर चौकात क्रिकेट बॅटने मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झालेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार युवकांनी तोंडावर मास्क परिधान केला हाेता. त्यांनी मुद्दाम गाडी आडवी घालून भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात नागरकरांनी मारहाण केली. दरम्यान नागरकर काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आला आहे. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून, प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT