manora crime news, washim, police, youth, chhatrapati shivaji maharaj chowk Saam tv
महाराष्ट्र

Washim Crime News : छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांत वाद, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशीमच्या मानोरा येथे भर दिवसा चार युवकांत वाद निर्माण झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यातूनच दोघांनी अन्य दाेघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका युवकाचा (youth) मृत्यू झाला असून दूसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. (Maharashtra News)

ही घटना (washim) मानोरा (manora) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर दुपारच्या सुमारस घडली. त्यामुळे मानोरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. युवकांवर हल्ला होत असताना अनेक जण घटनास्थळी उपस्थित हाेते. हा हल्ला झाल्यावर बघ्यांची मोठी गर्दी चाैकात जमली. या घटनेची माहिती कळताच पाेलीस देखील घटनास्थळी पाेहचले.

या हल्ल्यात शिवा विलास उघडे (राहणार बेलोरा) याचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. या घटनेत राहुल मनोहर चव्हाण (राहणार भुली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ अकाेला येथे पाठविल्याची माहिती पाेलिसांनी दिली. मनाेर पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाप्पाच्या दर्शनाला राजकीय पुढाऱ्यांनी ४ नंतर येऊ नका

आमदार मिटकरींचा हटके 'फ्रेंडशिप डे', चक्क झाडाला बनवलं मित्र, म्हणाले- मित्र हा जीवनात सापासारखा...|VIDEO

Pear Benefits: पेर खाण्याचे फायदे काय?

Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी

लाडकी बहीण योजनेसंदर्भात 'या' लिंकपासून सावध राहा; होऊ शकतो स्कॅम

SCROLL FOR NEXT