Yavatmal, darwha bus stand, youth , police Saam tv
महाराष्ट्र

Crime News : माजी उपाध्यक्षांच्या खून प्रकरणातील युवकाची भरदिवसा हत्या; बसस्थानक परिसरात तणाव

संपुर्ण बस स्थानकात तणावाचे वातावरण आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील दारव्हा (darwha) बसस्थानका जवळ एका युवकाचा (youth) भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. हा खून पुर्वीच्या भांडणातून तसेच वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. (Breaking Marathi News)

दारव्हा येथील बसस्थानका जवळ धारधार शस्त्र तसेच गोळी झाडून संदीप सुधाकर तोटे या युवकाची हत्या झाली आहे. संदीप हा दारव्हा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे.

सुभाष दुधे यांची नवरात्राेत्सव काळात सन 2018 कालावधीत हत्या झाली हाेती. दुधे यांची दगडाने ठेचून हत्या झाली हाेती. या खून प्रकरणी संदीप तोटे हा संशयित आरोपी हाेता. त्याचा खून दुधे प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी वर्तवला आहे.

दरम्यान या घटनेनंतर ताेटे याला मारणारे घटनास्थळावरुन पळून गेले. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेनंतर संदीप ताेटे याच्या नातेवाईकांनी टाहाे फाेडला. संपुर्ण बस स्थानकात तणावाचे वातावरण आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT