chandrapur, police, arrests, youth Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : चंद्रपूरात युवकाला CAR ने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद; दाेघे अटकेत

शहर पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

संजय तुमराम

Chandrapur : चंद्रपूर (chandrapur) शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी व्यापार संकुलात युवकाचा (youth) धक्कादायक मृत्यू झाला आहे. येथील एका बारमध्ये बसून मद्यप्राशन केल्यानंतर वाहनतळाच्या भागात उमंग दहिवले युवक पडून होता. रात्री दीड वाजता वाहनतळातून दोन कार (car) बाहेर पडल्या. त्यातील एका कारच्या चालकाने उमंगला चिरडले.

ही बाब लक्षात आल्यानंतर कारमधील युवकांनी उमंगला जखमी अवस्थेत रस्त्याच्या एका कडेला ठेवल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यानंतर ही कार निघून गेली. लगेच दुसऱ्या एका कारने मात्र उमंगला पुन्हा एकदा चिरडले. ही कार न थांबता पुढे गेली.

सकाळी याच ठिकाणी आलेल्या नागरिकांना (citizens) उमंग जखमी (injured) अवस्थेत दिसला. तातडीने त्याच्या मित्रांनी (friends) त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात (hospital) पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. (Maharashtra News)

ही घटना नक्की कशी घडली. यातील दोन्ही कारचालक मद्यधुंद अवस्थेत होते काय, मृत उमंगसोबत आणखी किती लोक या बारमध्ये होते याचा तपास शहर पोलीस (police) करत आहेत. सध्या पाेलिसांनी दाेन्ही कार चालकांना अटक (arrest) केली आहे अशी माहिती सुधाकर अंभोरे (पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT