afridi abdul shaikh, Soalpur, Mall, Civil Hospital saam tv
महाराष्ट्र

Solapur : सोलापूरात सफाई कर्मचाऱ्याचा शाॅक लागून मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

घरातील युवा पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात हाेती.

विश्वभूषण लिमये

Solapur : सोलापुरात (solapur) सफाई कर्मचाऱ्याचा शाॅक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. युवकाचा (youth) मृतदेह पाहून नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये (hospital) आक्रोश केला. (Breaking Marathi News)

सोलापूर शहरातील एका मॉलमध्ये साफ सफाईचे काम करताना युवा कर्मचाऱ्याला पाण्यात शाॅक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी आक्रोश केला. (Solapur Latest Marathi News)

आफ्रिदी अब्दुल शेख (afridi abdul shaikh) असे (वय २४) मृत युवकाचे नाव आहे. तो सोलापुरातील सहारा मशिद, आंबेडकर नगरचा रहिवासी होता. सोलापुरात पहाटे पासून पाऊस सुरू आहे. हा सफाई कर्मचारी मॉलच्या बसमेंटमध्ये सफाई करण्यासाठी गेला. तेथे पाणी हाेते.

त्याला तेथे शाॅक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर त्याचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलला आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलला गर्दी केली. तेथे त्याचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्राेश केला. दरम्यान घरातील युवा पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात हाेती. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT